ए.जी.कंट्रक्शन च्या कर्तव्य शून्य कारभारामुळे
- 151114996 - PRAMOD MISHRA
0
*ए जी कन्स्ट्रक्शनच्या कर्तव्य शून्य कारभारामुळे अपघाताची शृंखला सुरूच*
बुलढाणा मेहकर तालुक्यामधून शेगाव ते पंढरपूर पालखी मार्ग गेलेला असल्याने देऊळगाव साखरशा ते मेहकर ए जी कंस्ट्रक्शने कर्तव्य शून्य कारभाराने जानेफळ नजीक निंबा फाट्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यां न बनवल्याने ,पावसाळ्यामध्ये नजीकच्या लाल मातिच्या टेकडीचा गाळ रस्त्यावर वाहत असून ,अनेक अपघात होत आहे व जनतेला अपंगत्व येत आहे. लोकप्रतिनिधी, ए जी कन्ट्रक्शन व एमएसआरडी चे अधिकारी-कर्मचारी यांनी पाठ फिरवल्याने, अपघातांमध्ये अनेक व्यक्तीला अपंगत्व आले. या रस्त्यामुळे एखादेवेळी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*मेहकर तालुक्यामधुन जानेफळ मार्गे शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग गेलेला असुन,देऊळगाव साखर्शा ते मेहकर ए जी कंस्ट्रक्शने या रस्त्याचे काम केलेले असून,जानेफळ नजीक निंबा फाट्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी नाल्यां न बनवल्याने, नजीकच्या लाल टेकडीवरील लाल माती पावसाने रस्त्यावर वाहत येत असुन ती माती एक ते दीड फूट वाहत असल्याने, सदर रस्त्यावर वाहनाचे प्रतिदिन 10 ते 12 अपघात होत आहे व अनेकांना अपंग प्राप्त झालेला आहे.*
*सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या बनवाव्यात, लाला टेकडीच्या बाजूला संरक्षण भिंत बांधावी, व संबंधीत लोकप्रतिनिधीने जातीने लक्ष द्यावेत अशी मागणी जनता करीत आहे*
*लोकप्रतिनिधी मस्त, एजी कंस्ट्रक्शन सुस्त तर जनता अपघातांमध्ये होत आहेत त्रस्त, असे जनता बोलत आहे*