महात्मा फुले ब्रिगेडच्या संपर्क पदी शिवशंकर मगर
- 151120746 - RAVINDRA BHAGWAN SHURUSHE
0
महात्मा फुले ब्रिगेड च्या विदर्भ विभागीय संपर्क प्रमुख पदी शिवशंकर मगर याची नियुक्ती.
रवींद्र सुरुशे: मेहकर(बुलडाणा): विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी ता.मेहकर येथील शिवशंकर मोतीराम मगर यांची महात्मा फुले ब्रिगेड च्या विदर्भ विभागीय संपर्कप्रमुख पदी नियुत्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीसंदर्भात महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्तात्रय चांबारगे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस उत्तम जी गोरे
बुलढाणा जिल्हाध्यक्ष विवेक भोपळे, सचिव रमेश्वर जावळे, सहसचिव संतोष दिवेकर ,उपजिल्हाध्यक्ष सुजित राखुंडे. यांनी पत्रकाद्वारे नियुत्ती केली आहे.माळी संघटनेच्या माध्यमातून समाजाची आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक प्रगती साधली जात आहे.तसेच महात्मा फुले यांच्या विचारांचा वसा घेऊन सामाजिक कार्य दिव्यांगाणा शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्ट्या मजबुतीकरण करने महाराष्ट्रातील युवकांना व्यावसायिक उद्योजक बनवणे महात्मा फुले ब्रिगेडच्या माध्यमातून करण्याचा मानस यावेळी शिवशंकर मगर यांनी बोलून दाखविला.
त्यांच्या नियुत्तीबाबत जिल्हा संघटक ज्ञानदेव बळी, मेहकर तालुकाध्यक्ष राजेश मगर, तालुका उपाध्यक्ष महादेव डवंगे, तालुका सचिव विठ्ठल लाड, तालुका सहसचिव गणेश मोठे, तालुका संघटक कैलास चंदनसे, सहसंघटक हरिचंद्र पायघन, मीडिया प्रमुख समाधान डोईफोडे, मीडिया सहप्रमुख अमोल बुंदे, सहकोषाध्यक्ष विशाल लाड, संपर्कप्रमुख समाधान लोणकर,राम मोठे, गणेश रासकर अभिनंदन केले तसेच सर्व माळी समाज घटकाकडून अभिनंदन होत आहे.